Black Magic /
मेरठः करनी-कवट्यावर आजकाल कुणीच विश्वास ठेवत नाही आणी ठेवणारही नाही , पन हे आपल्याला जेवढं सरळ वाटत तेवढं नाही. आम्ही तुम्हाला एक अशीच याच संदर्भातली सत्य घटना सांगणार आहोत. आपल्याला सांगतो ही घटना मेरठमधली आहे . मेरठ च्या रिठाणी भागात संपूर्ण सुशिक्षित कुटुंबात घडलेल्या गूढ घटनेने सर्वच गाव हादरले आहे.
गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार , ओमप्रकाश यांच्या कुटुंबावर कोणीतरी करनी- कवटाळ म्हणजेच black magic करण्याचा सम्पूर्ण कुटुंबावर प्रयत्न केलेला आहे , ज्यामुळे परिवारातील सर्वांचे सुखी जीवन उद्ध्वस्त झालेले आहे . कुटुंबातील सदस्यांचे मानसिक संतुलन पूर्णतः बिघडले असून आता त्यांना रस्त्यावर भटकंती करावी लागत आहे. रविवारी ओम-प्रकाश यांचा धाकटा मुलगा अनुज याचा याच कारणाने मृत्यू झाल्याने गावात सर्वत्र भीतीचे आणि अफवांचे वातावरण पसरले आहे.
ओमप्रकाश यांचे मोठे बंधू सतीश अशे सांगतात की , संपूर्ण कुटुंबातील एकूण पाच जणांवर जादूटोणा करण्यात आलेला आहे. अनुजचा मृत्यू झाला आणी कुटुंबातील इतर सदस्य मानसिकदृष्ट्या पूर्णतः असंतुलित झाले आहेत, असे सतीश यांनी सांगितले . त्यांनी अशेही सांगितले , ओमप्रकाश यांची चार मुले अभ्यासात अप्रतिम होती. सर्वात मोठी मुलगी पूजा पदवीपरीक्षा नंतर IAS ची तयारी करत होती, तर सर्वात धाकटी मुलगी प्रीती BSC करत होती . त्यांचा भाऊ अजय मिस्टर UP असून जिम ट्रेनर आहे , तर सर्वात धाकटा भाऊ अनुज ग्रॅज्युएशन करत होता.
अनुज वर बुधवारी संध्याकाळी तिथेच मेरठमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला . अंत्यसंस्कारा नंतर टिल्लू , अजय , पूजा आणि आईला घरातील स्वतंत्र खोल्यांमध्ये पूर्णतः बंद करण्यात आले होते , कारण ते स्वतःचे किंवा इतर कोणाचे ही नुकसान करू नये.
हे चौघेही आज मानसिकदृष्ट्या अस्थिर झालेले असून ते बडबडत असल्याचे गावकऱ्यांना सांगण्यात आले. त्यांच्यावर कोणीतर black magic केली असे गावकऱ्यांचे म्हनने आहे .
या घटनेने आजूबाजूचे लोक खूपच हैराण झाले आहे. ओमप्रकाश यांचे सम्पूर्ण कुटुंब सुशिक्षित आणि हुशार होते, असे सर्वांचेच म्हणणे आहे. मुले चांगला अभ्यास करून भविष्याची तयारी करत होती. पन अचानक असे काय घडले असेल की एक होनहार कुटुंब तुटले ? हा प्रश्न अजूनही गावाकऱ्यांच्या व इतर लोकांच्या मनात घट्ट बसलेला आहे.