जगभरातील टॉप 100 विमानतळांमध्ये भारतातील फक्त न फक्त चार विमानतळांचाच समावेश

Only four airports in India feature in the top 100 airports in the world

जगभरातील टॉप शंभर विमानतळामध्ये भारतातील फक्त न फक्त चार विमानतळांचाच  समावेश केला गेला आहे, त्यात राजधानी नवी दिल्लीतील विमानतळ टॉप 50 मध्ये आहे. दरम्यान जगातील , टॉप 20 विमानतळामध्ये एकही भारतीय विमानतळाचा समावेश करण्यात आलेला नसला , तरीही यावेळी त्यांच्या क्रमांकात चांगलीच सुधारणा  झाल्याचे दिसून येत आहे. SKYTRAX  नावाच्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवास रेटिंग संस्थेने ही माहिती उघड केलेली आहे. तर सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टला 13 व्यांदा जगातील सर्वात उत्तम विमानतळ म्हणून निवडले गेले आहे. तरी SKYTRAX ने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत असणारे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ या यादीत यंदा 32 व्या क्रमांकावर आहे ही सर्वांसाठी गुड न्यूज आहे . [Only four airports in India feature in the top 100 airports in the world ]

जगभरातील टॉप 100 विमानतळांमध्ये भारतातील फक्त न फक्त चार विमानतळांचाच  समावेश

जगभरातील टॉप 100 विमानतळांमध्ये भारतातील फक्त न फक्त चार विमानतळांचाच  समावेश - DELHI AIRPORT

हे इतर सर्वांच्या तुलनेत भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ असून येथील विविध सोयी, आधुनिक टर्मिनल्स, मनमोहक वातावरण, कला प्रदर्शने, कार्यक्षम इमिग्रेशन प्रक्रिया आणि चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी हे विमानतळ
ओळखले जाते. विविध सोयी यावर दिल्या जातात विशेष म्हणजे, सोशल मीडियावर दिल्ली विमानतळा चा प्रचंड असा बोलबाला आहे. ते ग्लोबल टॉप ५ मध्ये आहे तरआशियाई विमानतळांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.बेंगळुरू येथील केंपेगौडाआंतरराष्ट्रीय विमानतळ यायादीत ४८ व्या क्रमांकावर आहे.


सिंगापूरचे चांगी एअरपोर्ट हे ' जगातील सर्वोत्तम विमानतळ '

SKYTRAX ने सिंगापूररातील चांगी एअरपोर्टला १३ व्यांदा  ' जगातील सर्वोत्तम विमानतळ ' म्हणून निवडून दिले आहे. लक्झरी , आराम त्याचबरोबर  मनोरंजनासाठी ओळखले जाणारे चांगी हे विमानतळापेक्षा पर्यटनस्थळ जास्त वाटते अशीच तिथली ओळख आहे . चांगी हे एक विशाल विमानतळ आहे. चांगी येथे प्रवासी त्यांच्या फ्लाइटच्या ४८ तास आधी चेक-इन करू शकतात. येथे एक भव्य ज्वेलरी मॉल , बाग , फुलपाखरांचे केंद्र व ४० मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच इनडोअर धबधबा ' रेन व्हर्टेक्स ' आहे . त्याशिवाय स्पा , हॉटेल्स , संग्रहालय , आर्ट गॅलरी ,
सिनेमा थिएटर , आणि अगदी डायनासोर थीम व लहान मोठ्यांसाठी पार्कदेखील आहे .




Post a Comment

Previous Post Next Post