आपल्या मुलांना T.V. पाहण्यापासून वेळीच रोखा नाहीतर मुलांचे आरोग्य गेलेच समजा !

 मुले सुचू देत नाहीत म्हणून आई बाबांनी मुलांना टीव्ही लाऊन देऊ नये 


आपल्या मुलांना T.V. पाहण्यापासून वेळीच रोखा नाहीतर मुलांचे आरोग्य गेलेच समजा !


       दैनंदिन जीवन जगतांना अनेक पालकांसमोर एक विचित्रच खूप  मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तो म्हणजे असा की लाडक्या मुलांना टीव्ही पाहण्यापासून कसंच रोखायचं , या अतीमहत्वाच्या प्रश्नावर तोडगा काढायला पालकांनी स्वतः पासूनच सुरुवात करायला हवी . लहान व मोठ्या मुलांना सांभाळायचं म्हणजे एकच उपाय त्यांना टीव्ही सुरू करून द्यायची आणि मग त्यांना खेळ खेळा व T. V पहा असं म्हणायचं जे चुकीचे आहे . त्यासाठी  पालकांनी मुलांना वेळेतला वेळ देणे आणि त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम पूर्णपणे घालवणे गरजेचे आहे.

* तुम्हाला सांगतोय दोन किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या  मुलांना T.V.  पाहण्यापासून दूर ठेवलेच पाहिजे.

* T.V. पाहण्याचा सल्ला आपण देण्याऐवजी त्यांना विविध मैदानी खेळ खेळण्यास तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे.

*  त्यांनी खेळ खेळल्यामुळे केवळ त्यांचे आरोग्यच चांगले राहनार असं नाही, तर त्यांच्यात तार्किक क्षमतासुद्धा चांगल्या प्रकारे विकसित होईल आणि स्मरणशक्तीचासुद्धा खूप चांगल्याप्रमाणे विकास होईल .

* घरातील मुलं कधी टीव्ही पाहणार हे तुम्ही त्यांना वेळ ठरवून द्या आणि ती वेळ तुम्ही स्वतःसुद्धा त्यांच्याबरोबर पाळा. म्हणजेच मुलांना T.V. पाहण्याची सवय लागणारच नाही.

* जर आपली मुलं कमीत कमी वेळ टीव्ही पाहत असतील तर मुलं वेळेवर जेवण करू शकतील आणि निवांत झोपू शकतील. यामुळे त्यांच्या वाढीत व विकासात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणारच नाही.

* विदेशात सर्वांना टीव्हीसमोर बसून जेवण करण्याची खूप सवय आहे. त्यामुळे वजनवाढीची समस्या त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर जाणवते . जी समस्या आज बऱ्याच ठिकाणी भारतातसुद्धा आढळून येत आहे.

* तुम्हाला सांगतो सतत T. V.  पाहणाऱ्या मुलांमध्ये खूप मोठ्याप्रमाणात हिंसक प्रवृत्ती आढळून येते. त्यांच्यात त्यांच्या कल्पनाशक्ती पन विकसित होत नाही.

* मुलांनी कमी टीव्ही पाहावी यासाठी पालकांनीसुद्धा T.V. कमीच पाहिला पाहिजे.

* मुलांच्या झोपण्याच्या खोलीत कधीच T.V. , Computer आणि Video Game ठेवू नका.

* मुलं जशी जशी मोठी होत जातील तसं तसं ते काय पाहतील याबाबत शंका जर तुमच्या मनात असतीलच तर मुलांशी मोकळेपणाने बोला. मात्र त्यांच्यावर अजिबात नजर ठेवू नका.

आपल्या मुलांना T.V. पाहण्यापासून वेळीच रोखा नाहीतर मुलांचे आरोग्य गेलेच समजा !




Post a Comment

Previous Post Next Post