DEVENDRA FADNAVIS : याच शेकऱ्याला 12 तास मोफत वीज देणार .
डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के व त्यापेक्षा ही जास्त शेतकऱ्यांना वर्षभर १२तास मोफत वीज सर्वच शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल. येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे देखील वीज बील दरवर्षी पेक्षा कमी होणार आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच आर्वी येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रम व भूमिपूजन प्रसंगी केले.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पणासह ७२० कोटी रुपयांच्या विकास कामांचे ई-लोकार्पण व भूमिपूजन झाले, यावेळी ते बोलत होते, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर , खासदार अमर काळे , आमदार सर्वश्री दादाराव केचे , समीर कुणावार , सुमीत वानखेडे , राजेश बकाने , माजी खासदार रामदास तडस , जिल्हाधिकारी वान्मथी सी. व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणी माजी खासदार सुरेश वाघमारे सोबतच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरीता गाखरे , सुनील गफाट , यावेळी हे सर्व उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेतलेले आहे व त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केलेली आहे. शेतीसाठी आम्हाला १२ तास विजेची शेतकऱ्यांची मागणी होती. यादृष्टीने महाराष्ट्र राज्य शासनाने प्रभावी अंमलबजावणी सुरु केले ली असून डिसेंबर २०२६ पर्यंत ८० टक्के शेतकयांना ३६५ दिवस दिवसाला व १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन दिली जाणार आहे.