पाण्याचा अनावश्यक वापर टाळा !
भारतात विविध ठिकाणी तापमान ५० अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. उकाड्याने हैराण झालेल्या उत्तर भारतातील जनतेप्रमाणे राजधानीत दिल्लीला पाणीटंचाईचा चांगलाच तडाखा बसला आहे. दिल्ली जल बोर्डाकडून येथे दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होत असे तिथे आज दिवसातून एकवेळच पाणीपुरवठा केला जात आहे.
नागरिकांकडून होणारा पाण्याचा अतिवापर , अवैध पाणीपुरवठा, घरेलु वापरासाठी पुरविल्या जाणाऱ्या पाण्याचा सर्व व्यापारी कारणांसाठी केला जाणारा वापर, तुटलेच्या नळांची दुरुस्ती न करणे, इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांमधून टाक्या भरून ओसंडून जाणारे पाणी, तसेच सार्वजनिक ठिकाणावर पाण्याचा केलेला गैरवापर, अशा अनेक कारणांमुळेही सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे . उपलब्ध होणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवनुक आणि माफक वापर करण्याच्या जर सवयी वेळोवेळी आपण लावून घेतल्यास मान्सूनपूर्व पाणी कपातीचे संकट ओढावणारच नाही.
तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणांनीसुद्धा जनतेला त्यांच्याकडे असलेल्या पाण्याच्या शिल्लक साठ्याबद्दल वेळोवेळी माहिती देऊन पाणी वापराबद्दल सावधगिरी बाळगण्याच्या सूचना 100% द्याव्या आणि जनतेला पाण्याचे मोल किती खऱ्या अर्थाने समजावून देण्याची गरज आहे. निव्वळ पाणी पुरवठ्याचा अपव्यय करणाऱ्यांच्या विरोधात फक्त दंडात्मक कारवाई करणे हा लोकांच्या अंगी मुरलेल्या सवयींमध्ये तत्काळ सुधारणा करणारा उपाय होऊ शकतच नाही. प्रत्येक शहरांतील /गावांतील पाणीपुरवठा करणाऱ्या प्रशासकीय सेवांना शहरांत पाणी अडवून ते इतर ठिकाणी साठवण करून त्याचे प्रत्येकाला ठराविक मर्यादा लावून वितरण केल्याशिवाय पाणीटंचाईचे प्रतिवर्षी उभे राहणारे पाणी टंचाईचे येणारे संकट दूर होणार नाही. आज जर दिल्लीसारख्या शहरात पाण्याचे संकट उभे राहिले असेल तर तसेच इतरही काही शहरे , निमशहरी प्रभाग , व ग्रामीण भाग यांनादेखील अशाच प्रकारच्या पाणीटंचाईच्या येणाऱ्या संकटांना सामोरे जावे लागनार आहे . त्यासाठी जर प्रत्येकाने वेळीच सावधगिरी बाळगत आपल्याला नियोजनबद्ध तयारी करण्याची गरज आहे.
आपण सर्वानी नक्कीच पाण्याचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे .