Take care of the children's food in this way. | अशा प्रकारे मुलांच्या जेवणाची काळजी घ्या .

Take care of the children's food in this way.  | अशा प्रकारे मुलांच्या जेवणाची काळजी घ्या . 


मुलांचा लंच बॉक्स व जेवणाचे नियोजन असे असायला हवे : 

       वाढत्या मुलामुलींचा जेवणाचे नियोजन व टिफीन आरोग्यवर्धक व शक्तीवर्धक असायलाच पाहिजे. त्यासाठी मुलांना पौष्टिक आहार देणे अत्यंत गरजेचे आहे. जेवणामध्ये व लंच बॉक्समध्ये मुलांना देण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात, पण आपण त्या कधी आणि केव्हा द्यायला पाहिजे हे महत्वाचे. यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे संपूर्ण आठवडयाचे एक मेन्यू कार्ड चे नियोजन तयार करून घ्यावे. त्यामुळे टिफीन बनवताना सरळ व सोपे जाईल. 

सोमवार / MONDAY

       पनीर, चीजचे चांगले कीस करून त्याचे परोठे किंवा धिरडे करून द्यावे. इतर गोष्टीच्या तुलनेत पनीरामध्ये प्रोटीन व कॅल्शियम थोडे जास्त असतात.

मंगळवार /  TUESDAY

मोड आलेले विविध प्रकारचे कडधान्य जसे मूग, चणे फ्राय केलेले, किंवा सँडविज बर्गरमध्ये भाज्या भरून मुलांना नक्की देऊ शकता. यातसुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात.

बुधवार / WEDNESDAY

विविध डाळीना भिजवून त्याची पेस्ट करून त्याचे टिकिया किंवा चिरडी बनवून मुलांना द्यावे. या टिकियांना
ब्रेडच्या मधोमध ठेवून किंवा चटणीसोबतसुद्धा तुम्ही देऊ शकता.

गुरुवार / THURSDAY

हिरव्या पालेभाज्या जसे की कोबी, मटर, पालक, मेथी इत्यादीचे पराठे बनवून देऊ शकता.  कडधान्यांना
उकळून बर्गर किंवा पिझ्झ्यामध्ये घालून द्यावे. मुलांना वेगवेगळी चव फारच आवडते.

शुक्रवार / FRIDAY

किसलेल्या गाजर, उकळलेल्या अंड्याचे स्लाईस सँडविजमध्ये भरून द्यावे, सोबतच हिरव्या भाज्या
काकडी, टोमॅटो इत्यादीसुद्धा त्यात भरून देऊ शकता. अंडीत कॅल्शियम आणि मिनरल्स सर्वाधिक असतात.

शनिवार / SATURDAY

चव बदलण्यासाठी एक दिवस मुलांना ताजी फळंसुद्धा तुम्ही देऊ शकता. हप्त्याला फळ बदलून द्यावे. बरेच वेळा मुलांना फळांना सोलून खाण्याचा कंटाळा येतोच, म्हणून संत्र्यांची सालं काढून व चिकूचे दोन तीन काप करून तुम्ही त्यांना देऊ शकता. 



:        या व्यतिरिक्त लहान मुलांना कुठल्याही वस्तूंची आकृती पाहून त्याकडे आकर्षित होण्याची सवय झालेली                 असते . म्हणून त्यांचा लंच बॉक्स आकर्षक असायलाच हवा. बॉक्समध्ये एक लहान चमचा सुद्धा तुम्ही त्यांना             द्यायला पाहिजे हवा

:       मुलांना आवडत असेल आणि शाळेत चालत असेल तर तुम्ही त्यांना टिफीन सोबत हेल्थ ड्रिंक्स बनाना शेक व          इतर देशी पेय , ऑरेंज ज्यूस सुद्धा देऊ शकता.
 
:       उन्हाळ्यात लहान मुलांच्या पाण्याच्या बाटलीत ग्लुकोजचे पाणी नक्कीच द्यायला पाहिजे.  

:       मुलांसाठी भाजी तयार करताना नेहमी मिक्स भाजी त्यांना द्यावी. यात गाजर, टोमॅटो, काकडी, मटर इत्यादी            भाज्यांचा समावेश असावा. 

:       मुलांना बिस्किट किंवा चिप्सचे पॅकेट देणे बहुदा टाळावेच . त्याच बरोबर चॉकलेट इत्यादीसुद्धा कमीत कमी             प्रमाणातच द्यावे. हे सर्व खाद्य पदार्थ हाय कॅलरी आहेत आणि तो न्यूट्रिलियन्स असतात.

:       टिफिनमध्ये ब्रेड देताना त्यांचे प्रकार नेहमीच बदलत राहावी. उदा. फुट ब्रेड, बन, फ्लॅट ब्रेड, माफीनं                      पिकलेटस, क्रिस्पब्रेड, राईस केक इत्यादी.
                                                                                       


Post a Comment

Previous Post Next Post