SARA TENDULKAR आहे कोट्यावधीची मालकीण , सारा ची कमाई पाहून थक्क व्हाल .
२६ व्या वर्षात कोट्यवधीची मालकीण आहे सारा तेंडुलकर
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरनी अगदी लहान वयातच स्वतःची जगा वेगळीच ओळख निर्माण केलीली आहे.
सारा तेंडुलकर आपल्या लाईफ स्टाईलसाठी खूपच जास्त प्रसिद्ध आहे.सारानी आपल्या आई सारखेच वैद्यकीय शिक्षण देखील पूर्ण केलेले आहे. आज तिने विविध क्षेत्रातही छाप उमटवली आहे. स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर सारा आजच्या क्षणी कोट्यवधीन रुपयांची मालकीण आहे.
साराचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ मध्ये झाला. तिने आपले सर्व शालेय शिक्षण मुंबईतल्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलेले असून नंतर तिने बायोमेडिकल सायन्समध्ये पदवी चे शिक्षण पूर्ण घेतलेले आहे. आणखी २०११ मध्ये सारा तेंडुलकरने अजिओ ल्यूक्ससाठी मॉडेलिंग पन केले. व इथूनच तिच्या मॉडेलिंग प्रवासाला सुरुवात झाली. तिने अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल फॅशन शोमध्ये बरेचदा मॉडेलिंग केलेली आहे.
मॉडेलिंगबरोबर सारा एक स्वतःचा बिझनेस चालवणारी वूमनदेखील आहे. तिने स्वतःचाच ऑनलाइन बिझनेस सुरू केलेला आहे. ती 'सारा प्लॅनर्स' या नावाने डायरीची विक्री देखील करते. सारा मॉडेलिंगबरोबरच ब्रँड एंडोर्समेंट, सारा प्लॅनर्सआणि इन्स्टाग्राम प्रमोशनच्या माध्यमातून तगडी कमाई सुद्धा करते. याशिवाय सोशल मीडियावरही ती प्रचंड अशी लोकप्रिय आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिचे लगभग ७. १ मिलिअन फॉलोअर्स असून मीडिया रिपोर्टनुसार साराचे नेटवर्थ १ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.