आज हनुमान जयंती ...
बजरंगबली चा जीवनप्रवास -
हनुमानजीचा जन्म हा वानरराज केसरी आणि अंजनी यांच्या पोटी झाला. तो वानर वंशातील होता आणि तो खूप कुशाग्र बुद्धीचा सोबतच अत्यंत शक्तिशाली होता. त्याला बजरंग बली असेही म्हणतात. यात दोन शब्द आहेत पहिला म्हणजे बजरंग आणि दुसरा बली. बजरंग म्हणजे लोखंडासारखा टणक शरीर
असलेला. व बली म्हणजे सर्वशक्तिमान.
हनुमानजींना इतर काही नावे आहेत म्हणजेच ,पवन पुत्र ( म्हणजे वाऱ्याचा पुत्र ), मारुती, केसरी- नंदन ( केसरीचा पुत्र ) , अंजनी-पुत्र आणि अंजनेय (अंजनीचा पुत्र) अशी आहे. हनुमानजी चा हनुमान चालीसेत असा उल्लेख केलेला आहे की तो स्वयंम साक्षात शंकराचा अवतार आहे श्रीरामाची सेवा करण्यासाठी आणि लंकेचा राजा राक्षस राजा रावणाचा नाश करण्यासाठी शंकराने हनुमानाच्या रूपात जन्म घेतला. हनुमान खूप बलवान , बुद्धिमान आणि दयाळू स्वभावाचे होते . तो श्री रामाचा भक्त आणि उपासक तर होताच सोबतच तो भक्ती आणि त्याग करत असे . हनुमानाचा जन्म दिवस हा मोठ्या थाटात साजरा केला जातो त्यास आपण हनुमान जयंती म्हणतो. हिंदू चंद्र महिन्याच्या चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती राहते.
श्री रामांशी भेट -
हनुमानजी मोठे झाल्यानंतर ते किष्किंधाचा राजा सुग्रीवाच्या दरबारात मंत्री झाले. वाली हा सुग्रीवाचा शक्तिशाली मोठा भाऊ होता. एकदा वाली एकाराक्षसाशी लढण्यासाठी एका गुहेत गेला व तो बराच वेळबाहेर आला नाही. गुहेतून रक्त वाहू लागले, म्हणूनसुग्रीवाला वाटले की वाली मरण पावला आहे. तो किष्किंधाला
परतला आणि त्याचा राजा झाला . पण काही काळानंतर,वाली परत आला आणि बाली ला वाटले की सुग्रीवाने त्याचा
विश्वासघात केला आहे त्याला फसवले आहे . याच कारणावरून दोघा भावात भांडणे निर्माण झाली व सुग्रीव आणि त्याचे मंत्री मंडळ पर्वतांमध्ये लपले, येथेच हनुमान सुग्रीवाचा मंत्री झाला .
जेव्हा श्री राम, त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण वनवासात होते, तेव्हा रावणाने माता सीतेला जबरदस्तीने पळवून नेले. श्री राम खूप दुःखात होते. जेव्हा ते मलय पर्वतावर आले तेव्हा ते सीता मातेच्या शोधात जंगलात भटकत होते. सुग्रीवाने त्यांना लक्ष्मणासोबत पाहिले. व सुग्रीव आणि त्यांचे साथीदार खूप घाबरले की वालीने श्री राम आणि लक्ष्मणयांना आपल्याला मारण्यासाठी पाठवले आहे. म्हणून सुग्रीव ते देखणे तरुण कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी अती उत्सुक होते. त्यांनी श्री रामांशी बोलण्यासाठी व मलयात येण्याच्या त्यांच्या उपस्थितीचे कारण शोधण्यासाठी हनुमानजी ची निवड केली. व हनुमानजी एक उत्तम राजदूत होता. तो इतर लोकांचे स्वरूप सहज ओळखू शकत होता. श्री राम आणि लक्ष्मणाला पाहताच त्याला जाणवले की ते कपटी नाहीत तर उदात्त व्यक्ती आहेत. सौम्य आणि आनंद दायी शब्दात त्याने त्यांना विचारले की ते कोण आहेत व त्यांना स्वतःबद्दल सांगितले. हनुमानाचे शब्द ऐकून श्री राम खूप आनंदीत झाले. ते लक्ष्मणाला म्हणाले, 'तू त्याचे शब्द ऐकलेस का ? तलवार उपसलेला शत्रू देखील अशा शब्दांनी शांत होईल. जर एकाद्या शासकाकडे असा दूत असेलच तर त्याचे प्रयत्न नेहमीच यशस्वी होतील.
महाबली हनुमान -
हनुमान श्रीराम आणि लक्ष्मण यांना सुग्रीवाकडे घेऊन गेलेत. त्यांना अशीच आशा होती की हे शूर तरुण सुग्रीवाला पुन्हा राजा करतील. शक्तिशाली हनुमाजी, श्रीराम आणि सुग्रीव यांनी एकमेकांना मदत करण्याचे वचन दिले आणी त्यांनी ते निभवलेपन. सुग्रीवाने केलेल्या कामांपैकी एक म्हणजे हनुमानाला सीतेचा शोध घेण्यासाठी पाठवणे. हनुमान सीतेचा शोध घेत असताना त्याला जटायूचा भाऊ संपती भेटला.
रावणाने सीतेचे अपहरण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असताना जटायूचा वध झाला संपत्तीने हनुमानाला सांगितले. त्याने सीतेला लंकेतील अशोक वाटिकेत कैदेत ठेवलेले पाहिले आहे. जेव्हा हनुमानजी लंकेत पोहोचले त्यानंतर त्यांनी सीता मातेचा शोध घेतला व त्यांची भेट करून घेतली.
त्यांचा उद्देश पूर्ण झाल्यानंतर रावणाच्या सेनेचा व रावणाच्या शक्तीचा अंदाज बांधण्यासाठी त्यांनी स्वतःला रावणाच्या सैनिकांच्या ताब्यात दिले. हनुमानजी लंकेत शिरले आणि लंकेची नासाडी अशोक वाटीकेची नासाडी केली म्हणून रावणाने हनुमानजीला शिक्षा म्हणून त्यांच्या शेपटीला आग लावण्याचे सांगितले. रावणाच्या सैनिकांनी हनुमानजीच्या शेपटीला चिंध्या बांधून आग लावण्यास सुरुवात केली त्यांनी असे करता हनुमानाने त्यांची शपटी लांब केली थकलेल्या राक्षसांनी अधिकचिंदा बांधण्याचा प्रयत्न करणे थांबवले आणि त्यांच्या शेपटीला आग लावली आता हनुमानाची पाळी होती त्यांच्या शेपटीला आग लावून त्याने संपूर्ण लंकेवर उडी मारली आणि संपूर्ण शहर पेटवले लंका पूर्ण जाळून खाक केली.
पवणपुत्राने पहाड उचलून आणला -
रावण आणि श्रीराम यांच्यात युद्ध सुरू असताना लक्ष्मणाला शक्ती लागली आणि तो मरणाच्या दारात बेशुद्ध पडला. वैद्याने रामाला सांगितले की जर लक्ष्मणासाठी गंधमादक पर्वतावरून संजीवनी नावाची वनस्पती आणली तरच तो बरा होईल. हनुमानाने पर्वतावर धाव घेतली पण तो संजीवनी नावाची वनस्पती ओळखू शकला नाही, म्हणून त्याने संपूर्ण पर्वतच उचलून वैद्य कडे आणला.
मारुती ची परीक्षा -
हनुमान हा श्रीरामाचा निस्वार्थ सेवक आणि परिपूर्ण भक्त आहे. त्याने जे काही त्याच्या जीवनात केले ते सर्व श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी होते. मग ते पूल बांधणी असो वा सीतामातेचा शोध असो, राक्षसांशी लढणे असो किंवा संजीवनी औषधी वनस्पती आणण्यासाठी देशभर उड्डाण करणे असो. जेव्हा त्याने सीतेमातेला रावणाच्या लंकेत पाहिले तेव्हा त्यांनी तिला फक्त श्रीरामाचा संदेशात दिला नाही तर, जंगलाचा नाश केला अनेक राक्षसांना मारले आणि लंके बरोबरच लंकेतील शस्त्र भंडाळ जाळून टाकले.हनुमानाने श्रीरामाकडून कधीही काहीही अपेक्षा केली नाही. श्रीरामाच्या हृदयात हनुमानाचे एक विशेष स्थान होते, हनुमानाची रामा वरील भक्ती प्राणा पेक्षाही प्रिय होती. त्याच्याशिवाय काहीही आणि सर्व काही हनुमानाला व्यर्थ वाटत असे.
एकदा सीता मातेने हनुमानजी ची थट्टा करत त्याला विचारले, की तू नुसता राम राम करतोय तुझ्या मनात खरंच राम आहे का. तर त्याचवेळी हनुमान जी ने सीता मातेला स्वतःची छाती फाडून श्रीराम यांची छवी हृदयात दाखवली अशे आमचे बजरंगी आहेत .
माहितीत काही चूक भूल झाली तर माफ करा .पोस्ट आवडल्यास सर्वांना नक्की शेअर करा .